संस्थेची वैशिष्ट्ये

आरमारी गाबीत समाज संस्थेच्या कार्य पद्धतीची खास वैशिष्ट्ये

  • घरबसल्या अथवा इतर कुठूनही स्मार्टफोनच्या (आणि Wi-Fi च्या) सहाय्याने केवळ पाच मिनिटात सभासद नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल,
  • नावीन्यपूर्ण पद्धतीने विकसित केलेली डिजिटल सभासद नोंदणी प्रक्रियेमुळे कोणत्याही प्रकारची चूक न होता सभासद नोंदणी प्रक्रिया (आणि त्याच सोबत सभासद-शुल्क भरणा) केवळ काही मिनिटात पूर्ण होणार.
  • आपण भरलेली आपली माहिती डिजिटल पद्धतीने टिपून ठेवली जाणार आणि त्यामध्ये कमालीची अचूकता असणार,
  • एकदा भरलेली माहिती हरविण्याची, गहाळ होण्याची शक्यता नहीवत.
  • आपला संस्थेचा सभासद क्रमांक आपल्याला एसएमएस आणि WhatsApp च्या माध्यमातून काळविला जाणार.
  • आपण संस्थेसाठी केलेला आर्थिक भरणा, अचूकपणे योग्य ठिकाणीच साठविला जाणार.
  • संस्थेकडे भरणा केलेल्या कोणत्याही पैशाचा अपहार होण्याची शक्यता जवळपास शून्य.
  • प्रस्थापित करण्यात येत असलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे अचूक असल्यामुळे संस्थेचे सभासदत्व घेणाऱ्या कोणत्याही नवीन सभासदाची संपूर्ण माहिती अचूकपणे नोंदविली जाणार.
  • संस्थेचे संभासदांचा परस्पर संपर्क, तसेच त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या समाज बांधवांचा संपर्कजाळे तयार करून त्याद्वारे समग्र गाबीत समाज एकत्र आणण्याची प्रक्रिया केली जाणार.
  • आपापल्या परिसरातील, जिल्ह्यातील, राज्यातील तसेच देश-परदेशातील गाबीत भगिनी आणि बंधूंना एकत्र जोडणार,
  • सभासदत्व प्राप्त केलेल्या प्रत्येक सभासदा सोबत ई-मेल तथा व्हाट्सअप द्वारा नियमित संपर्क, तसेच केवळ आवश्यक असेल त्या त्या वेळी पत्राद्वारे संपर्क, ई-मेलचा संपर्क खंडित झाल्यास त्याची त्वरित सूचना आपल्याला दिली जाईल.
  • सभासदत्व प्राप्त केलेल्या प्रत्येक सभासदा सोबत नियमित संपर्क आणि संस्थेच्या कामाबद्दलचे नियमित अपडेट्स दिले जाणार,
  • संस्थेच्या सभासदांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य ती प्रकारची कार्यवाही करण्याची संपूर्ण हमी,
  • संस्थेचा संपूर्ण हिशोब पूर्णपणे पारदर्शक राहणार,
  • संस्थेच्या सभासदांचे काहीही प्रश्न त्यांनी मांडल्याच्या / कळविल्याच्या (त्यांना लवकरात लवकर म्हणजे) २४/४८ तासात सोशल मीडिया वरून यथायोग्य मार्गदर्शन आणि जरूरी पाठपुरावा केला जाणार.