आरमारी गाबीत समाज संस्थेच्या कार्य पद्धतीची खास वैशिष्ट्ये
घरबसल्या अथवा इतर कुठूनही स्मार्टफोनच्या (आणि Wi-Fi च्या) सहाय्याने केवळ पाच मिनिटात सभासद नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल,
नावीन्यपूर्ण पद्धतीने विकसित केलेली डिजिटल सभासद नोंदणी प्रक्रियेमुळे कोणत्याही प्रकारची चूक न होता सभासद नोंदणी प्रक्रिया (आणि त्याच सोबत सभासद-शुल्क भरणा) केवळ काही मिनिटात पूर्ण होणार.
आपण भरलेली आपली माहिती डिजिटल पद्धतीने टिपून ठेवली जाणार आणि त्यामध्ये कमालीची अचूकता असणार,
एकदा भरलेली माहिती हरविण्याची, गहाळ होण्याची शक्यता नहीवत.
आपला संस्थेचा सभासद क्रमांक आपल्याला एसएमएस आणि WhatsApp च्या माध्यमातून काळविला जाणार.
आपण संस्थेसाठी केलेला आर्थिक भरणा, अचूकपणे योग्य ठिकाणीच साठविला जाणार.
संस्थेकडे भरणा केलेल्या कोणत्याही पैशाचा अपहार होण्याची शक्यता जवळपास शून्य.
प्रस्थापित करण्यात येत असलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे अचूक असल्यामुळे संस्थेचे सभासदत्व घेणाऱ्या कोणत्याही नवीन सभासदाची संपूर्ण माहिती अचूकपणे नोंदविली जाणार.
संस्थेचे संभासदांचा परस्पर संपर्क, तसेच त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या समाज बांधवांचा संपर्कजाळे तयार करून त्याद्वारे समग्र गाबीत समाज एकत्र आणण्याची प्रक्रिया केली जाणार.
आपापल्या परिसरातील, जिल्ह्यातील, राज्यातील तसेच देश-परदेशातील गाबीत भगिनी आणि बंधूंना एकत्र जोडणार,
सभासदत्व प्राप्त केलेल्या प्रत्येक सभासदा सोबत ई-मेल तथा व्हाट्सअप द्वारा नियमित संपर्क, तसेच केवळ आवश्यक असेल त्या त्या वेळी पत्राद्वारे संपर्क, ई-मेलचा संपर्क खंडित झाल्यास त्याची त्वरित सूचना आपल्याला दिली जाईल.
सभासदत्व प्राप्त केलेल्या प्रत्येक सभासदा सोबत नियमित संपर्क आणि संस्थेच्या कामाबद्दलचे नियमित अपडेट्स दिले जाणार,
संस्थेच्या सभासदांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य ती प्रकारची कार्यवाही करण्याची संपूर्ण हमी,
संस्थेचा संपूर्ण हिशोब पूर्णपणे पारदर्शक राहणार,
संस्थेच्या सभासदांचे काहीही प्रश्न त्यांनी मांडल्याच्या / कळविल्याच्या (त्यांना लवकरात लवकर म्हणजे) २४/४८ तासात सोशल मीडिया वरून यथायोग्य मार्गदर्शन आणि जरूरी पाठपुरावा केला जाणार.